वृक्षप्रेमाच्या साथीनं देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी सयाजी शिंदेंकडून अनोखी सलामी

वनं, वृक्ष आणि पर्यावरणावर असणारं त्यांचं प्रेम काही लपलेलं नाही. 

Updated: Jul 29, 2021, 05:20 PM IST
वृक्षप्रेमाच्या साथीनं देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी सयाजी शिंदेंकडून अनोखी सलामी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनय जगतात आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या अभिनेता सयाजी शिंदे यांनी कायमच समाजभान जपण्यालाही प्राधान्य दिलं आहे. वनं, वृक्ष आणि पर्यावरणावर असणारं त्यांचं प्रेम काही लपलेलं नाही. यातच भर म्हणजे देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ते एका नव्या आणि तितक्याच अनोख्या उपक्रमातून सर्वांपुढं आदर्श प्रस्थापित करणार आहेत. 

सहयाद्री देवराई आणि सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, 'झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं' हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार आहे. लोकप्रिस अभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या  संवेदनेतून आणखी एक अभिनव उपक्रम आकारास आला आहे. 
 
राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावत लोकसहभागातून राबवला जात आहे. या उपक्रमास महाराष्ट्र भरातून उस्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. सरपंच परिषदेव्यतिरिक्त स्थानिक नागरिक आणि स्थानिक सामाजिक संस्थाही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. 

देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी राज्यभरात 28813 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतिच्या अखत्यारीत असलेल्या गावांत लोकसहभागातून प्रत्येकी 100 स्वदेशी वाणाच्या झाडांचे रोपण- संगोपन करत एका नव्या अर्थाने राष्ट्रध्वजास सलामी द्यायचा मानस त्यांनी बाळगला आहे, 

उपक्रमासाठीचे महत्त्वाचे निकष 
या उपक्रमाअंतर्गत 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट २०२१ , कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त आपल्या क्षमतेनुसार वृक्षांची लागवड करावी. वृक्ष लावताना देशी आणि स्थानीक प्रजातीची असावीत. वृक्षारोपणासाठी लागणारी  सर्व झाडे, स्थानिक पंचायतीने किंवा संस्थानिआणून लावायची आहेत. 

सदर वृक्षारोपण हे गावातील जेष्ठ मंडळी यांच्या देखरेखीखाली, गावातील तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे,शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून करून घेणे अपेक्षितआहे.
ग्रामपंचायतीने शंभर झाडांची लागवड व जोपासना करण्याचा ठराव आणि सरपंच ग्रामसेवक यांचे सहभागी होत असल्याचे पत्र सहयाद्री देवराईच्या  ई-मेलवर पाठवावे.

आंबा,जांभूळ ,फणस, सीताफळ, बोर, चिकू, पेरु हयासारखी  विविध झाडे विविध संकरित वाणात उपलब्ध आहेत. उपजीविकेसाठी आणि गावाच्या आर्थिक उत्थानासाठी अधिक वाण देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाऊ शकते. 

सहभागी गावांचं होणार कौतुक 
या उपक्रमात जी गावे पाचशे वृक्ष किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष जोपासतील, त्यांना सह्याद्री देवराई च्यावतीने "विशेष गौरव" देऊन सन्मानित करण्यात येईल.

उपक्रम राबविण्यास सहयाद्री देवराई कडून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र   विभाग पातळी वर समन्वयक नेमले असून त्यांच्या मार्फत विभागातील सरपंच आणि स्थानिक लोकांना  मार्गदर्शन केले जाते.