अजित पवार यांनी या शब्दात पदाधिकाऱ्यांना फटकारले

राष्ट्रवादी आढावा बैठकती अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही, अशा पदाधिकऱ्यांना बाजूला केलं जाईल, कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Updated: Jul 5, 2017, 02:41 PM IST
अजित पवार यांनी या शब्दात पदाधिकाऱ्यांना फटकारले title=

पुणे : राष्ट्रवादी आढावा बैठकती अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही, अशा पदाधिकऱ्यांना बाजूला केलं जाईल, कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. विद्यार्थी आघाडीसाठी आक्रमक तरुण हवा, पण तो विद्यार्थी आघाडीसाठी शोभला पाहिजे, नाहीतर त्याचा मुलगा शाळेत जाणारा आणि हा विद्यार्थी नेता असं नको. 

ज्यांना स्वगृही परतायचय, त्यांनी अर्ज करावा, विचार करून निर्णय घेऊ आणि त्यांना मान सन्मान देऊन पक्षात घेतले जाणार नाही, त्यांनी तसं काहीही केलेले नाही, हे लक्षात घ्यावे. साधेपणानं त्यांचा प्रवेश होईल, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोशल मीडियावरून पक्षाची किंवा कुणा नेत्याती बदनामी करू नका, सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करा. पक्षातंर्गत गोष्टी बाहेरच्यांना पुरवण्याचे काम काही लोक करतात, असल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.

पक्षाला शांतपणे बाजू मांडणारा, ज्याची सटकत नाही, असे प्रवक्ते हवे आहेत. अजित पवारांची सटकते, त्यामुळे माझ्यासारखा नको. बोलताना शब्द जपून वापरला पाहिजे, नाहीतर काय होतं मला माहीत आहे, मी होतो म्हणून उभा राहिलो, अन्यथा संपलो असतो, असे अजित पवार म्हणालेत.