राज्यात पुन्हा देवेंद्र! वेगवेगळ्या एक्झिट पोलचं भाकीत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे.

Updated: Oct 22, 2019, 01:07 PM IST
राज्यात पुन्हा देवेंद्र! वेगवेगळ्या एक्झिट पोलचं भाकीत title=

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. सगळ्या उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम यंत्रात बंद झालं आहे. २४ ऑक्टोबरला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्याआधी आता वेगवेगळ्या वाहिन्यांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येणार, असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. २८८ जागांपैकी १६४ जागांवर भाजप आणि मित्रपक्ष तर १२४ जागांवर शिवसेना लढत आहे. तर आघाडीमध्ये काँग्रेसने १४७ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ उमेदवार दिले आहेत.

झी-२४ तास-पोल डायरीचा अंदाज

भाजप- १२१ ते १२८ जागा

शिवसेना- ५५ ते ६४ जागा

काँग्रेस- ३९ ते ४६ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- ३५ ते ४२ जागा

इतर- ३ ते २७ जागा 

आज तक- ऍक्सिसचा अंदाज 

भाजप- १०९ ते १२४ जागा

शिवसेना- ५७ ते ७० जागा 

काँग्रेस- ३२ ते ४० जागा 

राष्ट्रवादी काँग्रेस- ४० ते ५० जागा 

वंचित बहुजन आघाडी- ० ते २ जागा 

इतर- २२ ते ३२ जागा 

एबीपी- सीव्होटरचा अंदाज 

भाजप- १४० जागा

शिवसेना- ७० जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- ३२ जागा

काँग्रेस- ३१ जागा

इतर- १५ जागा

रिपब्लिक भारत- जन की बातचा अंदाज 

महायुती- २२३ जागा 

महाआघाडी- ५५ जागा

न्यूज १८- इपसॉसचा अंदाज 

महायुती- २४३ जागा

महाआघाडी- ४१ जागा 

एमआयएम- १ जागा

इतर- ०३ जागा

टीव्ही ९- सिसरोचा अंदाज 

भाजप- १२३ जागा

शिवसेना- ७४ जागा 

काँग्रेस- ४० जागा 

राष्ट्रवादी काँग्रेस- ३५ जागा 

इतर- ६ जागा

महाराष्ट्र- टाइम्स नाऊचा अंदाज 

भाजप- १३० जागा 

शिवसेना- ११३ जागा 

काँग्रेस- २१ जागा 

राष्ट्रवादी काँग्रेस- २० जागा 

इतर- ४ जागा