'मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांचा नकार'

 मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांचा नकार 

Updated: Nov 4, 2019, 02:22 PM IST
'मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांचा नकार' title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रात सुरु असलेल्या ओल्या दुष्काळाविषयी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. याचवेळी अमित शाह यांच्यासोबत राज्यातील सत्तासमीकरणाविषयी चर्चा झाली. यानुसार आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांचा नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांनी नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

५ किंवा ६ तारखेचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत होती. पण भाजप शिवसेना तिढा अद्याप कायम असल्याने ही तारीख ही बारगळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्रीपदासंदर्भात शिवसेनेशी चर्चा झालीच नसल्याचा पुनरोच्चार या भेटीत झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
राष्ट्रपती राजवट लागणार नाही असा भाजपला विश्वास असून ८ तारखेपूर्वी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.