अंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं.

Updated: Feb 28, 2023, 10:06 PM IST
अंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील मूर्तीची झीज झाल्याची बातमी झी २४ तासने दाखवली आणि लावून धरली. मुख्यमंत्र्यांनीही बातमीची दखल घेतली. त्यानंतर पुरातत्व विभागही खडबडून जागा झाला. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला तातडीनं भेट दिली.. अंबाबाईच्या मूळ मूर्तीची पाहणी करुन काही व्हिडीओ आणि फोटोग्राफ घेतले. 20 मिनिटं ही पाहणी करण्यात आली. केंद्रीय पुरातत्व विभागाला युद्धपातळीवर हा अहवाल पाठवण्यात येणार आहे.. 

आवश्यकता असेल तर मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमून अभ्यास करावा अशी मागणी राज्यसभा खासदार धनंजय महाडिकांनी केलीय....

संशोधकांचा दावा काय?

26 जानेवारीला 2023 

ऑगस्ट-सप्टेंबर 2022

देवीच्या पानपात्राच्या हाताच्या दोन बोटांची झीज

पावलावरील बोटांची झीज

देवीचं वाहन असणाऱ्या सिंहाच्या पाठीमागची बाजू दिसेनाशी, सिंहाचा चेहरा अस्पष्ट

देवीच्या अंगावरील सर्व अलंकार अस्पष्ट

साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई...अंबाबाईच्या मूर्तीची झीज होतेय ही बातमी झी २४ तासने दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालं आणि युद्धपातळीवर कामाला लागलं आहे. 

पुरातत्व विभागाचा रिपोर्ट
दरम्यान, अंबाबाई मूर्ती झीजप्रकरणी पुरातत्व विभागानं जिल्हाधिका-यांना रिपोर्ट सादर केलाय.. मूर्तीची संवर्धन प्रक्रिया आवश्यक आहे मात्र तातडीनं प्रक्रिया करावी लागेल अशी स्थिती नाही असा अहवाल पुरातत्व विभागानं सादर केलाय. केंद्रीय पुरातत्व कार्यालयाशी संपर्क सुरू असून लवकरात लवकर मूर्तीची संवर्धन प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिलीय.  झी 24 तासच्या बातमीची दखल घेत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या मंदिरात पाहणी केली. 

झी 24 तासनं अंबाबाई देवीच्या मूर्तीची कशा प्रकारे झीज झाली आहे हे पुराव्यानिशी दाखवलं होतं. मूर्तीची झीज होत असल्याची बातमी दाखवताच प्रशासन जागं झालं आणि त्यानंतर त्यांनी पाहणी केली. दोन अधिका-यांनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीची पाहणी करून त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफही घेतले. जवळपास 20 मिनिटं ही पाहणी करण्यात आली.