धक्कादायक, तीन कैद्यांजवळ न्यायालयाचे बोगस जामीनपत्र

हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून ( Harsul Central Jail) एक धक्कादायक बाब पुढे आली आहे.  

Updated: Feb 3, 2021, 02:31 PM IST
धक्कादायक, तीन कैद्यांजवळ न्यायालयाचे बोगस जामीनपत्र  title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून ( Harsul Central Jail) एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. तीन कैद्यांजवळ (Prisoner) न्यायालयाचे बोगस जामीनपत्र आढळले आहेत. (Court bogus bail to three Prisoner) त्यांच्या तपासणीत ही कागदपत्र आढळली आहेत. ही कागदपत्रे जेलमध्ये सादर करून जेलमधून निघण्याचा या कैद्यांचा प्रयत्न होता. 

धक्कादायक म्हणजे या कैद्यांना बीडच्या न्यायालयात (Beed Court) त्याच दिवशी सुनावणीसाठी नेण्यात येणार होते. परत येताना कदाचित हे कैदी (Prisoner) हे कागदपत्रे सादर करणार होते. महत्वाचे म्हणजे जेलच्या लेटर बॉक्समध्येही या जामीनपत्राच्या कॉपी ठेवण्यात आल्या होत्या.  त्यामुळे कैद्यांना सोडवण्यासाठी हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

हे तिन्ही आरोपी मकोकाच्या कारवाईत कैद आहेत. नक्की हे असले प्रकार कधीपासून सुरुय, कोण यात सहभागी आहे याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती काय पुढे येते, याची उत्सुकता लागली आहे.