एसटी चालकानं लहान मुलाच्या हाती दिलं स्टेअरिंग; पाहा पुढे काय झालं

प्रवाशांचा जीव धोक्यात घालत हे सुचलं तरी कसं... म्हणावं तरी काय?   

Updated: Sep 14, 2021, 01:50 PM IST
एसटी चालकानं लहान मुलाच्या हाती दिलं स्टेअरिंग; पाहा पुढे काय झालं title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

औरंगाबाद : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे कुणाला प्रसिद्धी मिळते, तर कुणाच्या वाट्य़ाचा याच व्हिडीओंमुळे अडचणींचा डोंगर उभा राहतो. व्हायरल व्हिडीओ कुणाला अपेक्षेपेक्षा जास्त शेकतंसुद्धा. 

व्हायरल व्हिडीओचं हे प्रकरण सध्या महागात पडलं आहे एका एसटी चालकाला. थट्टामस्करीमध्ये त्यानं असं काही केलंय, की थेट त्याच्या नोकरीवरच गदा आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर डेपोतील एका एसटी चालकानं प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. एसटी भरधाव वेगात चालवत असतानाच या चालकाने लहान मुलाला मांडीवर बसवून मागचापुढचा विचार न करता थेट त्याच्या हातात स्टेअरिंग दिली. 

परिस्थिती आणि मुलाचा उत्साह पाहता, जर बसचे स्टेअरिंग त्याने जोरात फिरवले असते तर काय घडलं असतं याचा विचारही न केलेलाच बरा. सदर प्रकरणाची बातमी झी 24 तासवर दाखवताच या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.