नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला, भाड्यात ३० ते ४० टक्के वाढ

नाशिककरांच्या खिशावर भार...

Updated: Sep 14, 2019, 04:42 PM IST
नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला, भाड्यात ३० ते ४० टक्के वाढ title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये रिक्षाचालकांना तीन प्रवाशांचीच सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांच्या सक्तीमुळे रिक्षाचालकांनीही प्रवासी भाड्यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ केली आहे. रिक्षाचालकांच्या या बेकायदा भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

३ प्रवाशांच्या सक्तीचा प्रवाशांच्या खिशावर भार

नाशिक शहरातला शेअर रिक्षा प्रवास आता महागला आहे. नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांनी ३ प्रवाशांची सक्ती केली आहे. ३ प्रवासी परवडत नसल्यानं आता रिक्षा चालकांनी शेअर रिक्षा भाड्यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ केली आहे. नियमाप्रमाणं प्रवासी वाहतुकीचा नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यानं याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसतो आहे.

रिक्षांमधून नियमाप्रमाणंच प्रवासी वाहतूक होईल यावर पोलीस ठाम आहेत. जे नियम पाळणार नाहीत त्यांना दंड केला जाईल असं पोलीस सांगतात.

रिक्षाचालकांनी स्वतःहून केलेली भाडेवाढ बेकायदा आहे. त्यामुळं प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे वाढीव भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी होते आहे.