मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, सर्वपक्षीय आमदार विधानसभेत आक्रमक

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे विधानसभेत दिसून आले. हक्कभंगाची शिफारस होऊनही कारवाई न झाल्यानं आमदार आक्रमक झालेत. यावेळी दीपिका चव्हाण यांनी ठिय्या मांडला

Updated: Dec 21, 2017, 03:48 PM IST
मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, सर्वपक्षीय आमदार विधानसभेत आक्रमक title=

नागपूर : मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे विधानसभेत दिसून आले. हक्कभंगाची शिफारस होऊनही कारवाई न झाल्यानं आमदार आक्रमक झालेत. यावेळी दीपिका चव्हाण यांनी ठिय्या मांडला

विधानसभेत गोंधळ 

विधीमंडळात कामकाजाच्या शेवटचे काही तास उरलेले असताना, आज विधानसभेत आमदारांच्या विशेष अधिकाराच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक झाले. हक्कभंग समितीनं काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली. पण कारवाई होत नसल्यानं सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. 

 दीपिका चव्हाण यांचा हक्कभंग

बागलाणचे तहसिलदार सुनील सौंदाणे यांच्याविरोधात आमदार दीपिका चव्हाण यांनी हक्कभंग मांडला होता. याप्रकरणी दीड वर्ष चौकशी न करता मुदतवाढ मागितल्यानं आमदार आक्रमक झाले. सुनील सौंदणेंनी वापरलेली अरेरावीची भाषाही दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत उदृत केली.

दीपिका चव्हाण आक्रमक

जोपर्यंत कारवाई होत नाही, तोवर सभागृहातच थांबणार असल्याचं सांगत दीपिका चव्हाण आक्रमक झाल्या. चव्हाण यांच्यासोबत विधानसभेत आमदारांनी वेलमध्ये ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं.