Balasaheb Thackeray Birth Anniversary: आठवणीतील बाळासाहेब, पाहा ठाकरी शैलीतील निवडक भाषणे...

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांना आदरांजली वाहत आठवणींना उजाळा दिला जात आहे. मंचावरुन आपल्या ठाकरी शैलीत तुफान भाषण करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. संपूर्ण देशभरातून आज त्यांचं स्मरण केलं जात असून अभिवादन केलं जात आहे.  

Updated: Jan 23, 2023, 11:31 AM IST
Balasaheb Thackeray Birth Anniversary: आठवणीतील बाळासाहेब, पाहा ठाकरी शैलीतील निवडक भाषणे... title=
(File Photo: Reuters)

Balasaheb Thackeray Birth Anniversary: जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो....हे शब्द कानावर पडले की सर्वात प्रथम डोळ्यांसमोर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचाच चेहरा उभा राहतो. बाळासाहेब ठाकरे मंचावर भाषणासाठी जेव्हा उभे राहायचे तेव्हा फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर राज्यासह, देशभरातील राजकीय नेत्याचंही ते काय बोलणार याकडे लक्ष असायचं. आपल्या ठाकरी शैलीने त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं. विरोधकही त्यांच्या भाषणांचं कौतुक करायचे. त्यांच्या भाषणांच्या व्हिडीओंना आजही युट्यूबवर लाखो व्ह्यू आहेत. आज बाळासाहेबांची 97 वी जयंती असून यानिमित्ताने त्यांची निवडक भाषणं पाहूयात.....

1) बाळासाहेबांचं 1998 दसरा मेळाव्यातील भाषण

 

2) बीकेसीत महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा बाळासाहेबांनी केलेलं भाषण, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडेही यावेळी मंचावर उपस्थित होते.

3) बाळासाहेब ठाकरेंचं 1988 मधील भाषण

4) बाळासाहेबांचं 2010 च्या दसरा मेळाव्यातील भाषण

5) बाळासाहेबांनी भाषणातून अनेकदा हिंदुत्वावर आपली भूमिका मांडली होती. या भाषणात त्यांनी शिवसेना आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा असा आदेशच दिला होता. 

6) या व्हिडीओत बाळासाहेबांच्या भाषणातील काही मोजके भाग तुम्ही पाहू शकता

7) हिंदूंना आता सहिष्णुवादी राहण्याची गरज नसून कोणी विरोधात उभं राहिलं तर त्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता