या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी

पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 19, 2017, 01:12 PM IST
या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी  title=

मुंबई : कापूस आणि सोयाबीन यावर फवारणीसाठी वापरणाऱ्या पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणण्याचे कृषी विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विभागाने सूचना आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 

यासंदर्भात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक, तसेच अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या कुलगुरुंकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. 

ही कीटकनाशके मनुष्यजिवितास हानीकारक असल्याने कीटकनाशक अधिनियम १९६८ च्या कलम २७ मधील अधिकारांचा वापर करुन यवतमाळ,बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांमध्ये या ५ किटकनाशकांच्या विक्री,वितरण व वापरावर, विषबाधा प्रकरणाचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत ६० दिवसांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.