स्वामींच्या मृत्यू पूर्वीच समाधी उभारणार; भक्तांची जिल्हाधिकऱ्यांकडे जागेची मागणी

पंढपूर येथील स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या भक्तांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच समाधी उभारण्यासाठी जागेची मागणी केली आहे.  

Updated: Nov 25, 2023, 09:21 PM IST
स्वामींच्या मृत्यू पूर्वीच समाधी उभारणार;  भक्तांची जिल्हाधिकऱ्यांकडे जागेची मागणी title=

Pandharpur News: स्वामींच्या मृत्यू पूर्वीच भक्तानी त्यांची समाधी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. सन्याशी साधूच्या भक्तांनी मृत्यू पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केलेय. समाधी स्थळासाठी भक्तांनी जागा निवडली आहे. पंढरपूर मधील दत्त घाट येथील स्थळ सन्याशी स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या मृत्यू पूर्वीच भक्तांनी स्थळ समाधी साठी चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंटात जागा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मधील सुधाकर मुरलीधर पुंड यांनी दहा वर्षापूर्वी स्थळ सन्यास घेतला आहे. त्यानंतर पंढरपूर सोडले नाही. सध्या ते भागवत धर्म बाल योगी सेवा मंडळ मठात राहतात. सध्या त्यांचे वय 85 आहे. ते सतत आजारी असतात. वार्धक्य मुळे कधी त्यांना कधीही देवज्ञा होऊ शकते. स्थळ सन्यास घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करत नाहीत. त्यांना जल समाधी दिली जाते. किंवा जमिनीत पुरतात त्यामुळे मृत्यू नंतर वेळ जाऊ नये यासाठी मृत्यू पूर्वीच भक्तांनी माधवा नंद सरस्वती महाराज यांच्या स्थळ समाधी साठी जिल्हाधिकऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.

भोंदू बाबाचा व्यक्तीवर लिंबाचा उतारा

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जादुटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय. इगतपुरीतील टाकेत इथल्या कुंडावर एका भोंदू बाबानं एका व्यक्तीवर लिंबाचा उतारा केला आहे. हा भोंदूबाबा या व्यक्तीच्या अंगावरुन लिंब फिरव होता आणि ती लिंब कापून कुंडात टाकत होता. मंदिराच्या महंतांनी या भोंदू बाबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र आरेरावी करत तो त्यांनाही जुमानत नव्हता त्याचा हा सगळा प्रकार स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. यानंतर /e भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला चोपून काढले

कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करणारा भोंदू बाबा आणि त्याच्या मुलाला महिलांनी चांगला चोप दिला. पुण्याच्या नाना पेठेत घडलेली ही घटना आहे. नंदकुमार भागवत आणि त्याचा मुलगा अभिजीत भागवत या दोघांना स्थानिक महिलांनी चांगला चोप दिला. हे दोघे त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचे. त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. हे करत असताना त्यांनी एका महिलेला तिचा फ्लॅट आपल्या नावावर करण्याचा तगादा लावला. परिसरातील महिला कार्यकर्त्यांना या गोष्टीची कुणकुण लागली आणि त्यांनी या भोंदू बाबाच्या घरी धडक देत त्याला धडा शिकवला.या भोंदू बाबा पिता पुत्राला चोप दिल्यानंतर या महिलांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. रात्री उशिरा त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.