Breaking | अनाधिकृत भोंग्यावर कारवाई होणार; गृह मंत्रालय सूत्रांची माहिती

राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर, योग्य परवानगीनेच करता येईल,असे निर्देश गृहविभागाकडून देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated: Apr 18, 2022, 11:25 AM IST
Breaking | अनाधिकृत भोंग्यावर कारवाई होणार; गृह मंत्रालय सूत्रांची माहिती title=

मुंबई : राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर, योग्य परवानगीनेच करता येईल,असे निर्देश गृहविभागाकडून देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे दुपारी पोलिस महासंचालक (DGP) आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले. 

स्थानिक पोलिस धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे आहे का यांची माहिती घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे आदेश गृह मंत्रालयाने पोलिसांना  दिले आहेत. तसेच रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत भोंगे लावता येणार नाही. यामुळे पहाटे लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर बंदी येणार अशी माहिती गृह मंत्रालय सूत्रांनी दिली. तसेच, भोंगेच्या आवाजावर ही मर्यादा येणार आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्याविरोधात आवाज उठवला होता. तर मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास हनुमान चालिसाही भोंगे लावून करू असा इशारा दिला होता. मात्र, आता या मुद्द्याला राज्याच्या गृहविभागाने गांभीर्याने घेतलं आहे.