मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा; कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

पावसाळयात कोल्हापूर, सांगली, आणि सातारा मधील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार होते. सदर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दिले तर सोलापूर सातारा आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. 

Updated: Jul 13, 2023, 12:09 AM IST
मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा; कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर :  पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी आनंदाची बातमी आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे.  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण दृष्टीने पाहिले पाऊल मानले जात आहे.  

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन दुष्काळी भागातील आमदार शहाजी पाटील, आमदार बबनराव शिंदे , आमदार जय कुमार गोरे आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत  कृष्णा भीमा योजनेला हिरवा कंदील मिळाला आहे. 

दुष्काळ कायमस्वरूपी संपेल 

पावसाळ्यामध्ये  कोल्हापूर" सांगली  व साताऱ्यातील काही भाग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतुन  जे पाणी वाहून जाते. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये  होत असते. यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल. 

20 हजार कोटीच्या निधीची तरतूद

या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीची बैठक घेऊन आज फडणवीस यानी या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली आहे व हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून  त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद आज करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.

यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे  भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा चा प्रश्न यामुळे मिटणार आहे हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.