शुभम झाला मोहम्मद अली... मुलाचं धर्मांतरण केल्याची आईची पोलिसात तक्रार; अकोला येथील धक्कादायक प्रकार

अकोला येथे एका मुलाचे धर्मांतर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाचे आईनेच पोलिस ठाण्यात मुलाचे धर्मांतर झाल्याची तक्रार केली आहे. 

Updated: Jul 12, 2023, 08:47 PM IST
शुभम झाला मोहम्मद अली... मुलाचं धर्मांतरण केल्याची आईची पोलिसात तक्रार; अकोला येथील धक्कादायक प्रकार  title=

Akola News : ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर केल्याचे प्रकरण देशभर चांगलेच गाजत आहे. अशाच महाराष्ट्रात देखील धर्मांतर केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.  मुलाचा धर्मांतर केल्याच आरोप करत आईने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अकोला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धर्मांतरनंतर मुलाने नाव बदलल्याचे देखील आईने तक्रारीत म्हंटले आहे. 

अकोला जिल्ह्यात शुभम नावाच्या मुलाचे धर्मांतर झाले आहे. तो शुभमचा मोहम्मद अली झाला आहे. आपल्या मुलाला पैशाचा मोह दाखवित धर्म परिवर्तन करण्यात आला असल्याचा आरोप मुलाच्या आईने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या देशात धर्मांतरणाचा मुद्दा गाजत असतांना अकोल्यातील आलेगाव येथे एका हिंदू मुलाचा धर्मांतरण जबरदस्ती करण्यात आला असल्याची पोलीस तक्रार एका महिलेने दिली आहे. हैद्राबाद येथे नोकरीचे आमिष दाखवत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी धर्मांचर केल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. 

नोकरीच्या ठिकाणी न नेता मदरशामध्ये ठेवल्याचा आरोप

मुलाला हैदराबाद येथे नोकरीसाठी न नेता बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री परिसरात एका मदरशात ठेवल्याची बाब समोर आली आहेय. ज्या व्यक्तीने शुभमला काम मिळवून देण्याचा बहाण्याने घरून नेले त्या व्यक्तीला विचारणा करणासाठी गेलेल्या शुभमच्या आईला आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर चारही आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहेय. 

शुभम सध्या आई-वडिलांसोबत राहत असून आपण मुस्लिम धर्म स्वखुशीने स्वीकारला असल्याचं त्याच म्हणण आहे. पोलिसांनी मात्र आता शुभमने मुस्लिम धर्म स्वखुशीने स्वीकारला आहे का ? की त्याला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडलं आहे? याचा तपास करीत आहेत.

ऑनलाईन गेम्सच्या आडून लहान मुलांना धर्मांतर केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गाझियाबादमधल्या 17 वर्षांच्या जैन धर्मीय मुलानं गुपचूप इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचे त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघड झाला. धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या मुंब्रा येथील शाहनवाज याला पोलिसांनी अटक केली. यात पाकिस्तान कनेक्शन असल्याचं तपासात समोर आले. शाहनवाजच्या मोबाईल फोनमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर आढळून आले.

सध्या शाहनवाझचा ताबा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांकडे आहे. मुंब्र्यातील रहिवासी असलेला शाहनवाझ हा सहा ई-मेल आयडी वापरत होता आणि त्यापैकी एकाच्या इनबॉक्समध्ये पाकिस्तानातून आलेले ई-मेल आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानी व्यक्तींच्या नंबरबाबत काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस शाहनवाझविरुद्ध कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याची शक्यता आहे.