शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय

Sharad Pawar NCP New Symbol: शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाला जे पाहिजे होते तेच नाव तेच मिळाले आहे. पक्षाचं चिन्ह देखील लवकरच दिले जाणार आहे. 

Updated: Feb 19, 2024, 05:42 PM IST
शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय  title=

Sharad Pawar NCP New Symbol: राष्ट्रवादी शरद पवार गटाला  सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळलाा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव तसेच चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार असा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. तर,  एक आठवड्याच्या आत चिन्हाचे वाटप करण्याचे निर्देशही सप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी शरद पवार गटाबाबत काय निर्णय घेतला?

पुढील आदेशापर्यंत 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. येत्या आठवडाभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटातर्फे करण्यात आली. ही विनंती कोर्टानं मान्य केली.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. ही विनंती कोर्टानं मान्य केली आहे. वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. 

शरद पवार गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी

अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची याचिका तातडीनं सुनावणीसाठी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलंय.