रुग्णवाहीका न मिळाल्याने गर्भवती महिला मोटारसायकलवरून रुग्णालयात

 बेशुद्ध अवस्थेत तिला मोटरसायकलवरून गावबाहेरच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. 

Updated: Jun 27, 2019, 02:37 PM IST
रुग्णवाहीका न मिळाल्याने गर्भवती महिला मोटारसायकलवरून रुग्णालयात title=

झारखंड : आरोग्य क्षेत्रात सुधारणा केल्याचे लाखो दावे सरकार करत असेल पण आजही आरोग्य सेवा उघड्यावर पडल्याचे वेळोवेळी दिसून येते. झारखंडच्या लातेहारमधील एका गर्भवती महिलेस रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध झाली नाही. अशावेळी बेशुद्ध अवस्थेत तिला मोटरसायकलवरून गावबाहेरच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. साधारण 10 कि.मीचा प्रवास मोटरसायकलवरुन करावा लागला. शांति देवी असे या महिलेचे नाव आहे. शांति देवी कामता या चटुआग गावच्या टोला चिरखोड येथे राहणाऱ्या कमल गंझु यांची पत्नी आहे. 

लातेहार रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार केल्यानंतर रांची येथील रिम्स येथे पाठवण्यात आले. लातेहार रुग्णालयात तिला रक्त चढवण्यात आले. या महिलेची स्थिती इतकी गंभीर होती की ती स्वत:च्या पायावर उभीही राहू शकत नव्हती. अशा अवस्थेत असताना देखील तिला रुग्णवाहीका उपलब्ध होत नव्हती. यासंदर्भात अयुब खान यांनी सीएचसी प्रभारी निलीमा कुमारी यांना फोन करुन रुग्णवाहीका मागवली. पण ती उपलब्ध करुन देण्यात आली नाही. 108 वर फोन करुनही प्रश्न सुटला नाही. 

असहाय्य वेदना घेऊन ही महिला गावात तडफत राहीली. तिला तीन दिवसांपासून ताप होता. त्यात रक्ताच्या अभावामुळे मृत्यूशी झुंजत होती.