मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता

 मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपनं एकहाती सत्तेचा झेंडा फडकवला आहे. महापालिकेच्या एकूण ९४ जागांपैकी तब्बल ५४ जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. तर १६ जागा जिंकलेल्या शिवसेनेला दुस-या स्थानावर समाधान मानावं लागलंय. काँग्रेसनं समाधानकारक कामगिरी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र पानिपत झालं आहे.

Updated: Aug 21, 2017, 04:12 PM IST
मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता title=

मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपनं एकहाती सत्तेचा झेंडा फडकवला आहे. महापालिकेच्या एकूण ९४ जागांपैकी तब्बल ५४ जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. तर १६ जागा जिंकलेल्या शिवसेनेला दुस-या स्थानावर समाधान मानावं लागलंय. काँग्रेसनं समाधानकारक कामगिरी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र पानिपत झालं आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपच्या खालोखाल दुस-या स्थानावर होती. मात्र यंदा मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सपशेल नाकारलंय. मनसेही भोपळा फोडण्यात अपयशी ठरलीय. अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमधली भाजपची विजयी घोडदौड मिरा-भाईंदरमध्येही कायम राहिल्यानं विरोधकांना मोठा धक्का बसलाय आहे.

हा विश्वास आणि विकासाला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांनी देश पादाक्रांत केला होता. त्यामुळं शिवसेना यापुढेही स्वबळावर लढणार असल्याचं परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी सांगितलं.