भाजप आमदार सरकार विरोधात बसले आंदोलनाला

नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. 

Updated: Feb 16, 2018, 07:16 PM IST
भाजप आमदार सरकार विरोधात बसले आंदोलनाला title=

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. 

यशवंत सिन्हा यांचाही पाठिंबा

आशिष देशमुखांच्या या ठिय्या आंदोलनाला भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा आज भेट देणार आहेत. भाजप नेतृत्वाविरोधात नेहमीच आवाज उठवणारे यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरत गेल्या डिसेंबर महिन्यात अकोल्यातही ठिय्या आंदोलन केलं होतं. 

देशमुखांचा आरोप

मात्र, त्यांच्या सहभागामुळे वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांशी असलेली मुख्यमंत्र्यांची नाळ तुटल्याचा आरोप काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनीं केला आहे.