मनसे पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणी बच्चू कडुंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

 प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांवर दंगल आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 10:36 AM IST
मनसे पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणी बच्चू कडुंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल title=

नागपूर : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांवर दंगल आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे शहराध्यक्षाचं अपहरण

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नागपुरात हा गुन्हा करण्यात आला आहे. संतोष बद्रे असं मारहाण आणि अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. बद्रे अमरावती शहर मनसे अध्यक्ष आहे. दोन दिवसापूर्वी आमदार बच्चू कडू आणि संतोष बद्रे यांच्यात फोनवरून संभाषण झालं. त्यात बद्रे यांनी कडूंना यांच्याशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केल्याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर मंगळवारी संतोष बद्रे एका मित्रासोबत खाजगी रुग्णालयात आले.

पोलिसांना बघताच सर्व पसार

नागपूरच्या जनता चौकात बोलेरो गाडीतून आलेल्या ४ ते ५ जणांनी बद्रेंना मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर रहाटे  चौकात बोलोरेला पोलिसांनी अडवलं. पोलिसांना बघताच सर्वजण बद्रेंना गाडीतच सोडून पसार झाले. बद्रेंवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोलोरे गाडीतल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तुषार पुंडकर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तुषार व इतर आरोपी हे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत असून याप्रकरणी धंतोली पोलिसांनी अपहरण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडिओ