ही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल

मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये गुर्दल्याचा धुडगूस, महिलांना पाहून अश्लिल हावभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर  

Updated: Jan 5, 2023, 02:51 PM IST
ही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरच्या लोकलमध्ये (Local Train) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेने  लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून रेल्वे पोलीसांच्या कार्यक्षमतेवरही प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.

काय आहे व्हिडिओत?
आज सकाळी  कर्जतला जाणाऱ्या लोकलच्या डब्यात हा प्रकार घडला आहे. हा गर्दुला (Drug Addicts) ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जतला (Thane to Karjat) जाणाऱ्या लोकलमध्ये चढला आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर (Vithalwadi Railway Station) उतरला. मात्र त्या दरम्यान तो लोकलमध्ये बसून खुलेआम सिगारेट (Cigarettes) तसेच अमली पदार्थ सेवन करत होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दारात उभे राहून या विकलांग डब्याला (Disabled Compartment) लागून असलेल्या महिलांच्या डब्याकडे (Ladies Coach) पाहून अश्लील हाव भाव आणि हातवारे करत  गोंधळ घातला. हा सर्व व्हिडिओ लोकलमधील एका जागृक प्रवाशांने चित्रित केला आहे. 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोकलमध्ये रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे प्रकार याआधीही अनेकवेळा घडले आहेत. काही वर्षांपूर्वी चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करत तिला चालत्या रेल्वेतून फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना आठगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती. वाढत्या लोंढ्यांमुळे गंभीर स्वरुपाची गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत असून महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. 

अहवालात धक्कादायक माहिती
राज्यात गेल्या काही वर्षात महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या आणि छळवणुकीच्या घटनेत वर्षागणिक 12.24 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अगदी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगापासून तर विवाहित स्त्रीच्या छळवणुकीच्या घटनेपर्यंत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांत 10 ते 25 टक्के वाढ झाल्याचे देखील या अहवालात सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात घट व्हावी म्हणून अनेक विधायक आणि धडक मोहीम शासनाने राबवून देखील त्याचा फारसा परिणाम महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीवर जाणवत नसल्याचे चित्र या आकडेवारीमुळे जाणवतं.