एकतर्फी प्रेमातून बालकाचं अपहरण करून हत्या

एकतर्फी प्रेमातून बालकाची हत्या केल्याची घटना समोर आलेय.  

Surendra Gangan Updated: Apr 7, 2018, 01:14 PM IST
एकतर्फी प्रेमातून बालकाचं अपहरण करून हत्या title=

अमरावती : एकतर्फी प्रेमातून बालकाची हत्या केल्याची घटना समोर आलेय. नऊ वर्षीय निष्पाप बालकाचे अपहरण करून एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील दुनी येथे घडली. 

तिसरीत शिकणारा रोशन बुधवारी शाळेत गेला होता. मात्र शाळा सुटल्यानंतर परत घरी न आल्याने आई वडिलांनी शोध घेतला. तो न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शोध घेतल्यानंतर रोशनचा मृतदेह पोटीलावा गावाजवळील जंगलात सापडला. 

दरम्यान, हत्या करणाऱ्या २९ वर्षीय रवी जावरकर याला पोलिसांनी पाटकहू येथून अटक केलीय. रवी जावरकर हा एकतर्फी प्रेम करीत होता. आरोपीने अनेक वेळा भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती दुदैवी बालकाच्या मोठ्या बहिणीने दिली. आरोपी रवी जावरकरला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.