देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी राज्यात प्रवासबंदी कायम

कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरातली विमानसेवा अजूनही ठप्प आहे. 

Updated: May 23, 2020, 10:29 PM IST
देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी राज्यात प्रवासबंदी कायम title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरातली विमानसेवा अजूनही ठप्प आहे. केंद्र सरकारने २५मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पण राज्यात मात्र विमान प्रवासाची बंदी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून विमान उड्डाण करण्यास किंवा महाराष्ट्रातील विमानतळांवर विमान उतरवण्यास राज्य सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही.

विमान प्रवासाबाबत १९ मे रोजी काढलेला आदेशच राज्यात सध्या लागू आहे. या आदेशानुसार राज्यात विमान प्रवासावर बंदी कायम राहणार आहे. देशामध्ये विमानसेवा सुरू होणार असली, तरी महाराष्ट्रात विमान वाहतूक सुरू न करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक नाही.