अरे बापरे ! शाळा सुरु झाल्या आणि 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

16 students Corona positive : कोरोनाचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Dec 18, 2021, 09:40 AM IST
अरे बापरे ! शाळा सुरु झाल्या आणि 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : 16 students Corona positive : कोरोनाचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे. राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

नवी मुंबईतील घणसोलीत शेतकरी विद्यालयातल्या 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसात या विद्यालयातील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आलेत. यानंतर नवी मुंबई महापालिकेने 375 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली. तर आज 600 विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. (Corona positive 16 students from Shetkari Vidyalaya in Ghansoli at Navi Mumbai)

घणसोलीतील शेतकरी विद्यालयात गेल्या दोन दिवसात 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो मुलगा याच शाळेत येत होता. दरम्यान, या परदेशी व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

नवी मुंबईत काल दिवसभरात महापालिकेने 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी महापालिका करणार आहे.