Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  

Updated: Nov 12, 2022, 02:46 PM IST
Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न title=
संग्रहित छाया

Pune Crime News: mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  एका अल्पवयीन मुलीचे तिच्या आईने तिच्या प्रियकराशी बळजबरीने लग्न लावले. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर प्रियकराने अत्याचार केलेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. (Woman gets her  lover married to her 15-year-old daughter, arrested in Pune)

अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिल्या प्रकरणी पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार आणि बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार वडगाव शेरी भागात घडला. 6 नोव्हेंबरला अहमदनगरमधील एका मंदिरात आपल्या मुलीचे आईने लग्न लावून दिले, अशी माहिती पुढे आली आहे.

आधी मुलीला सांगितले हे तुझे वडील..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब वडगाव शेरी भागात वास्तव्यास आहे. पिडीत मुलीची आईचे संबंध एका व्यक्तीशी होते आणि तिने तिच्या मुलीला हेच तुझे वडील आहेत, असे सांगितले मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला तुला या व्यक्तीशी लग्न करावे लागेल नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीला आईने आरोपीशी लग्न करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपीने अनेकवेळा या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

अशी माहिती आली पुढे...

पिडीत मुलगी ही पंधना वर्षांची आहे. तिच्यासोबत झालेली घटना तिने आपल्या शाळेतल्या मित्राला सांगितल्यानंतर हे हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात कलम 506, 376 यासह बालविवाह प्रतीबंधक अधिनियम 9, 10,11 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून अधिनियम या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

36 वर्षीय महिला आणि तिच्या 28 वर्षीय प्रियकराला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींखाली अटक करण्यात आली आहे,  असे एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.  या पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले, 'पंधरा वर्षीय पीडितेने तिचा त्रास एका वर्गमित्राला सांगितला. तेव्हा ही घटना उघडकीस आली आणि एका महिला सामाजिक कार्यकर्त्याला सतर्क करण्यात आले. हा पुरुष दूरचा नातेवाईक आहे आणि आरोपी महिलेसोबत राहत होता.