सावधान! सोशल मीडियातून गंडा घालणारी टोळी नाशिकमध्ये सक्रीय

बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.

अण्णासाहेब चवरे & Updated: Jul 30, 2018, 09:34 AM IST
सावधान! सोशल मीडियातून गंडा घालणारी टोळी नाशिकमध्ये सक्रीय title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक: अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय सहभागी होऊ लागलाय. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आपला आर्थिक हित साधत आहेत. एक आंतरराष्ट्रीय टोळी भारतात सक्रिय होऊ लागलीय. बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.

इंटरनेटवरचे मेसेज आणि संवाद डिलीट करू नये

अशा प्रकारच्या तीन घटना सायबर तज्ज्ञांपर्यन्त पोहचल्या आहेत. काहीजण भीतीपोटी आणि बदनामी होईल म्हणून माहिती देत नाहीत. अलीकडे अशा प्रकारचे मेसेजेस आणि संपर्क करणारी टोळी सक्रिय होत असल्याने आपल्याकडील असलेली सुरक्षितता जपायला हवी. त्यासाठी सायबर तज्ज्ञांचा सल्ला असा की,  सर्व मेसेज आणि संवाद डिलीट करू नये आणि असा प्रकार घडल्यास सायबर सेलशी संवाद साधावा.

आयटी इंजिनिअर्सलाही फटका

या टोळीचा फटका नाशिकमधील चक्क आयटी इंजिनिअरलाही बसला. सतीश भदाणे असे या इंजिनिअर्सचे नाव आहे. सतीश भदाणे हे नेहमीप्रमाणे आपला ई-मेल तपासात होते. दरम्यान, समोर आला आंतरराष्ट्रीय ई-मेल... ई-मेल पाहून सतीश हे चांगलेच धास्तावून गेलेत... ईमेल काही साधा सुधा नव्हता... चक्क ब्लॅकमेलिंग करणारा होता... आणि धमकी देणाराही होता.. ईमेल मध्ये इंग्रजी भाषेत स्पष्ट लिहलय... तुम्ही अश्लील व्हिडिओ आणि फोटो बघता आहात याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत...तुम्ही दिलेल्या पत्त्यावर २४ तासाच्या आत बीटकोईन स्वरुपात पैसे भरा... अन्यथा तुमच्या फेसबूकपेजवर अश्लील व्हिडिओ अपलोड केले जाईल.. आणि याबाबत कुणालाही माहिती देऊ नका नाहीतर तुम्ही पॉर्न व्हिडिओ बघता हे सर्व तुमच्या कॉनटॅक्ट मध्ये असलेल्यांना व्हायरल केल जाईल... हा सर्व ईमेल वाचून सतीश हे चांगलेच धास्तावले असून मोठा मनस्तापही होऊ लागलाय. यामध्ये धक्कादायक म्हणजे पुणे आणि मुंबईमधील देखील हा प्रकार घडला आहे.. तर सतीश यांच्याबाबत हा प्रसंग दुसर्‍यांदा होतोय.

काय कराल जर आपल्याबाबत असे घडत असेल तर -

1) जो इंटरनेटद्वारे संवाद झालाय तो डिलिट करू नका कारण कायदेशीर पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जाऊ शकतो 
2) तुमच्या जवळील व्यक्तिला याबाबत तात्काळ माहिती द्या 
3) जर वारंवार असा प्रकार घडत असेल तर सायबर एक्स्पर्टची मदत घेऊन सायबर सेलकडे तक्रार दाखल करा 
4) उपयोगी नसलेले अप्स मोबाइल मधून कडून टाका 
5) आणि सर्वात महत्वाचा फेसबूक, ईमेल आणि व्हाट्सअप वापरतांना सेकंड स्टेप ऑफ वेरीफिकेशन ऑन करावे म्हणजे अनओथोराईज अक्सेस पासून सुरक्षा होईल.