शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

नाशिकच्या शेतकऱ्यांची नवी भरारी नाशिकच्या शेतकऱ्यांची नवी भरारी

नाशिकच्या या शेळ्या-मेंढ्या विमानाने थेट दुबईला निघाल्यायत. भारतीय शेळ्या-मेंढ्यांना अरब राष्ट्रात चांगली मागणी आहे.

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर नाशिकच्या गोदावरी नदीला पूर

एकाच दिवसातल्या विक्रामी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स,पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादवामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय.

अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली

शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय. 

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारला संप कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारला संप

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिबा दर्शवला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्या जाणवणार आहे.

कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गेडाम यांची बदली, नाशिककर संतापले कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गेडाम यांची बदली, नाशिककर संतापले

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणकुमार गेडाम यांची अखेर नाशिकहून बदली झालीय. त्याविरोधात आता नाशकात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय. 

नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण

खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.

नाशिक मनपाच्या शाळेत विद्यार्थी हजर पण शिक्षकच नाहीत नाशिक मनपाच्या शाळेत विद्यार्थी हजर पण शिक्षकच नाहीत

महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. त्यात 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. निवृत्त होणा-यांची संख्या वाढते. त्या तुलनेत पुरेसे शिक्षक नाहीत. 

भुजबळ समर्थक सैरभर, नाशकात राजकीय पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर भुजबळ समर्थक सैरभर, नाशकात राजकीय पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात सध्या युती सोडून सर्वच पक्ष फुटीच्या उंबरठयावर आहेत. सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादीला आता पदाधिकारी उरलेला नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाविरोधात टांगती तलवार असून भुजबळ समर्थक सैरभर झाले आहेत.

राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर

विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय अशी चर्चा, कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. 

करवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के! करवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के!

नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. 

बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी

बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. 

पोरींनो परंपरा उखडून फेका…! पोरींनो परंपरा उखडून फेका…!

समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. 

लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

नाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा नाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा

शहरातील भद्रकाली परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा 'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.

नाशिकमध्ये उच्चभ्रू भागात देहविक्री, ४ मुली अटकेत नाशिकमध्ये उच्चभ्रू भागात देहविक्री, ४ मुली अटकेत

शहरात एका सायली ब्युटी पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली, हे पार्लर शहरातील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर असलेल्या शरणपूररोड भागात आहे. 

लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला

 लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला. 

नाशिकमध्ये मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त... नाशिकमध्ये मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त...

नाशिक पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परराज्यात लाखो रुपयांनी विक्री केली जायची. एका पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी एका महिलेसह तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. यांच्यासारखेच अजून २० एजंट मुलींची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक! कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे.