पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड

गेले काही दिवस शांत असलेले पिंपरी चिंचवड तोडफोडीच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. चिंचवड मध्ये मंगलमूर्ती वाड्याजवळ टोळक्याने रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराला १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Sep 8, 2017, 10:07 AM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड title=

पिंपरी : गेले काही दिवस शांत असलेले पिंपरी चिंचवड तोडफोडीच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. चिंचवड मध्ये मंगलमूर्ती वाड्याजवळ टोळक्याने रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराला १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

दोन गटात झालेल्या वादानंतर दहशत माजवण्यासाठी ही तोडफोड झाल्याचे बोलले जात आहे. रिसरात दोन टोळ्यांमध्ये वारंवार वाद होत असतात. त्याच वादातून बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला मिळेल ती गाडी टोळक्यांनी फोडल्या.

कार, टेम्पो, रिक्षा अश्या तब्बल १५ गाड्या फोडण्यात आल्या. परिसरातल्या नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र निषेध नोंदवला आहे. त्याचप्रमाणे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत.