'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मंत्रालयातील 'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Updated: Jan 2, 2020, 12:29 PM IST
'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण title=

मुंबई : मंत्रालयातील ६०२ क्रमांकाचे दालन हे अपशकुनी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या दालनात जो नेता जातो तो पुन्हा येत नाही अशी देखील चर्चा आहे.  नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही हे दालन स्वीकारायला तयार नाहीत असे देखील सांगितले जात होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. 

६०२ नंबरची रुम नाकारली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही पवार घराणे घराबद्दल कोणतीही अंधश्रद्धा पाळत नाही. २०२० सुरु झाले आहे. २१ व्या शतकात अंधश्रद्धेवर कोणीही यावर विश्वास ठेवत नाही. ज्येष्ठतेनुसार दालनं देण्यात आली आहेत. अजित पवार, अशोक चव्हाण,दिलीप वळसे पाटील अशा क्रमाने राज्यमंत्री पदापर्यंतची दालनं देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. तिथे दोन तीन मिनिस्टर राहून गेले आहेत. त्यामुळे ते दालन मला सोडणे मला योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले. 

मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या दालनानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दालन हे सर्वात मोठं दालन आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आता कोणताच मंत्री जायला तयार नाही. ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील हे दालन स्वीकारण्यास नकार दिला आहे.

काय आहे यामागची कारणं.... 

एकनाथ खडसे सुरूवातीला या दालनात बसायचे. 9 मार्च 2013 रोजी मंत्रालयाला आग लागली. या आगीत या दालनाचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर या सर्व परिसराचं नुतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी हे दालन उपमुख्यमंत्रीपदाचे दालन म्हणूनच बनविण्यात आलं. 

नुतनीकरणानंतर अजित पवार काही काळ ६०२ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाच्या दालनात होते. आता अजित पवारांनी हे दालन स्वीकारण्यास नकार दिला होता. अजित पवार त्या शेजारी असलेलं दालन घेणार असल्याची चर्चा होती. पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या चर्चेवरचा पडदा उघडला आहे.