अपघातात ९ सेमी गळ्यात घुसलेली लाकडी काडी काढण्यात डॉक्टरांना यश

भिवंडीच्या अंबाडी परिसरात राहणाऱ्या रमेश गजरे यांचा गाडीवरून पडून अपघात झाला. यावेळी रस्त्यावर पडलेली लाकडी

Updated: Jan 20, 2020, 09:40 PM IST

ठाणे : भिवंडीच्या अंबाडी परिसरात राहणाऱ्या रमेश गजरे यांचा गाडीवरून पडून अपघात झाला. यावेळी रस्त्यावर पडलेली लाकडी काडी त्यांच्या गळ्यात नऊ सेंटीमीटरपर्यंत आत घुसली. तातडीने मित्र मंडळींनी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. 

त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.  जखमेतून अगोदरच झालेला रक्तस्नाव पाहून  डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि यशस्वी शस्त्रक्रिया करत रमेश यांचे प्राण वाचवले.

घुसलेल्या काडीमुळे गळ्याजवळील महत्त्वाच्या भागांना किती दुखापत झाली, याचा अंदाज येत नव्हता. मात्र दोन तास चाललेल्या शस्त्रक्रीयेनंतर  ती काडी बाहेर काढण्यात आली.अशा प्रकारची अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातली ही बहुधा  पहिलीच वेळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.