मोकाट कुत्र्यांनी ७ बकऱ्यांना केलं ठार

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी 

Updated: Jun 24, 2018, 09:54 PM IST
मोकाट कुत्र्यांनी ७ बकऱ्यांना केलं ठार title=

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या मटण मार्केटमध्ये पहाटे मोकाट कुत्र्यांनी शिरून ७ बकऱ्यांना ठार केले. जटपूरा परिसरात महानगरपालिकेचे अतिशय जुने मटण मार्केट आहे. त्यामुळे या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. या मटण मार्केटच्या परिसरात दाट लोकवस्ती आहे. अशा ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी ७ बकऱ्यांना ठार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी असलेल्या मटण व्यावसायिकांनी महानगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.