संभाजीराजेंच्या समाधी स्थळावर अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर

काही दिवसांतच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  

Updated: Feb 15, 2020, 07:25 PM IST
संभाजीराजेंच्या समाधी स्थळावर अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर title=

हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी झी मराठी वाहिनी वरील‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांनी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक गावामध्ये येवून महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मालिकेचा संघर्ष कसा घडला हे सांगताना अभिनेता व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे भरुन आले. 

गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगत जनतेचे आभार मानले.  

काही चुकलं, राहिलं असेल तर माफ करा असे म्हणून कोल्हेंनी यावेळी अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका हे एक व्रत आणि स्पप्न होते ती मालिका आता पुर्णत्वास जात असताना अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेऊन शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे आश्वासन खासदार डॉ अमोल कोल्हेंनी स्पष्ट केले. 

काही दिवसांतच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता काळीज फाटेल, काळजात धस्स होईल, काळजाला घरे पडतील असा दुर्दैवी क्षण.... अशा पद्धतीचे क्षण मालिकेत पाहायला मिळत आहेत.