डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : अमोल काळेला सीबीआय कोठडी

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

Updated: Sep 6, 2018, 05:48 PM IST
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : अमोल काळेला सीबीआय कोठडी  title=

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेला ९ दिवस म्हणजे १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने अमोल काळेला कर्नाटक एटीएसकडून ताब्यात घेतलं होतं. 

दरम्यान तपासाबाबत न्यायालायात युक्तीवाद करु नका. त्यामुळे तपासातली महत्त्वाची माहिती माध्यमांद्वारे प्रसिद्ध होते. त्यामुळे फक्त केस डायरी न्यायालयात सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे युक्तीवाद न करता फक्त केस डायरी देत सीबीआयने अमोल काळेच्या सीबीआय कोठडीची मागणी न्यायालयात केली.