...आणि पत्नीने पतीवर गरम तेल ओतले

पुण्यातील वानवडी भागात दारुच्या नशेत असलेल्या पत्नीने आपल्या पतीवरच उकळते तेल फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Updated: Jul 17, 2017, 09:18 PM IST

पुणे : पुण्यातील वानवडी भागात दारुच्या नशेत असलेल्या पत्नीने आपल्या पतीवरच उकळते तेल फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये.

भरत अर्जुन शेरसिया असं या व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात भरत १० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

शनिवारी रात्री भरत आणि त्याची पत्नी जया यांचे भांडण झाले. या भांडणाआधी दोघांनी एकत्र दारु प्यायली होती. वादानंतर दोघेही झोपले. मात्र पत्नी जयाच्या मनात भरतबद्दलचा राग खदखदत होता. या रागातच तिने आपल्या पतीच्या अंगावर गरम तेल ओतले. यात तो १० टक्के भाजलाय.

भरत आणि जया यांचा प्रेमविवाह झाला होता. मुंबई-पुणे प्रवासात त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर मात्र त्याचा विचार न करता दोघे विवाहबद्ध झाले. मात्र कामानिमित्त भरत मुंबईत राहत होता तर जया पुण्यात राहत होती. शनिवारी तो पुण्यात राहण्यासाठी आला असता रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पत्नी जयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.