बोरीवली-ठाणे-नाशिक मार्गावर धावणार ई-बसेस

St BUS : प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2024 ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून होणार आहे.

Updated: Feb 12, 2024, 05:40 PM IST
बोरीवली-ठाणे-नाशिक मार्गावर धावणार ई-बसेस  title=

Shivai Electric Buses: महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने (MSRTC) बोरीवली-ठाणे-नाशिक मार्गावर ई-बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जींग स्थानके निर्माण केली जात आहेत. या प्रकल्पाची सुरूवात बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर या बसेची सुरुवात करण्यात येत आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.  हा लोकार्पण सोहळा  ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून होणार आहे.

34 आसनी, वातानुकूलित ई-बसेस उद्या (13 फेब्रुवारी) पासून बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बस मध्ये महिलांना 50 टक्के, 65 ते 75 वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे.   सदर बसेस आगाऊ आरक्षणासाठी www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservatio‍n App  या मोबाईल आरक्षण ॲपवर उपलब्ध होणार आहेत. तरी, या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या सुमारे 13 हजार बसेस आहेत. यामध्ये तीन हजारांहून अधिक बसेसची नादुरुस्त आणि कालबाह्य मुदत संपलेली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या जास्त पण बसेसचा तुटवडा जाणवत आहे. एसटी महामंडळ नवीन बस सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सध्या एसटीच्या मध्यंतरी साध्या व निमराम हिरकणी बसेसची उभारणी सुरू आहे. म्हणजेच 9 मीटर आणि 12 मीटर इलेक्ट्रिक बसेस कंत्राटी पद्धतीने खरेदी केल्या जाणार आहेत. किंवा बससेवेचा ठेकेदार चालक असेल आणि एसटी महामंडळ प्रति किलोमीटर 48 रुपये कंत्राटदाराला देईल.