कांदा घेऊन जाणारा आयशर-ट्रेलरचा अपघात; दोघांचा मृत्यू

मालेगावच्या कौळाणे शिवारातील घटना.  

Updated: Jun 1, 2021, 07:46 AM IST
कांदा घेऊन जाणारा आयशर-ट्रेलरचा अपघात; दोघांचा मृत्यू title=

मालेगाव : कांदे घेऊन जाणारा आयशर आणि रॉडने भरलेल्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली आहे. आगीमध्ये वाहनांनी पेट घेतल्यामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाले तर दोन  जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. ही घटना मनमाड - मालेगाव रोडवरील कौळाणे शिवारात घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दल आणि तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पण या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.