नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष निवड : आधी राडा मग युती, रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी

Election of new Mayor and Deputy Mayor of Raigad : रायगडमध्ये निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाली. आता आरोप - प्रत्यारोपानंतर नगराध्यक्ष पद निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी संधी मिळणार आहे.

Updated: Feb 10, 2022, 02:01 PM IST
नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष निवड : आधी राडा मग युती, रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी title=

अलिबाग : Election of new Mayor and Deputy Mayor of Raigad : रायगडमध्ये निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाली. मात्र, निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेवर आरोप केले. त्यानंतर शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या राड्यानंतर भविष्यात रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अंतर राखून राहिल, अशी चर्चा होती. मात्र, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत पुन्हा युती झालेली दिसून येत आहे. या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला फिफ्टी फिफ्टी संधी मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 6 नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना फिफ्टी फिफ्टी यश मिळाले आहे. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 3 नगराध्यक्ष पदे मिळाली. खालापूरमध्ये सेनेच्या रोशनी मोडवे तर पोलादपुरात सेनेच्याच सोनाली गायकवाड बिनविरोध नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. पालीत राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा तर तळ्यात राष्ट्रवादीच्याच अस्मिता भोरावकर याना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.

 म्हसळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे असहल कादिरी हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या माणगाव नगराध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानदेव पवार हे विराजमान झाले आहेत. उपनगराध्यक्ष पदाची निवडणूकदेखील आज पार पडली.  ही निवड अडीच वर्षांसाठी असणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन नागराध्यक्षांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

माणगाव येथील नवीन नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई , आमदार भरत गोगावले हजर होते. नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजप बरोबर हात मिळवणी केली हा सुनील तटकरे यांचा आरोप सुभाष देसाई यांनी फेटाळून लावला. माणगाव मध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष 

1) माणगाव - 
नगराध्यक्ष -ज्ञानदेव पवार , शिवसेना 
उपनगराध्यक्ष - सचिन बोंबले , शिवसेना आघाडी

2) पोलादपूर - 
नगराध्यक्ष - सोनाली गायकवाड, शिवसेना (बिनविरोध)
उपनगराध्यक्ष - नागेश पवार, शिवसेना

3) खालापूर -
नगराध्यक्ष - रोशनी मोडवे , शिवसेना (बिनविरोध)
उपनगराध्यक्ष - राजेश पार्टे, राष्ट्रवादी

4) म्हसळा - 
नगराध्यक्ष-  असहल कादिरी , राष्ट्रवादी
उपनगराध्यक्ष - सुनील शेडगे, राष्ट्रवादी

5) तळा - 
नगराध्यक्ष - अस्मिता भोरावकर , राष्ट्रवादी (बिनविरोध)
उपनगराध्यक्ष - चंद्रकांत रोडे , राष्ट्रवादी

6) पाली -  
नगराध्यक्ष - गीता पालरेचा , राष्ट्रवादी (बिनविरोध)
उपनगराध्यक्ष - आरिफ मणियार , शेकाप