viral video: वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले पण... कर्मचाऱ्यांनी मांडला कॅरमचा डाव!

नागपुरात संताप जनक प्रकार एका वायरल व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आलेला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील हा व्हिडिओ आहे. 

Updated: Nov 5, 2022, 02:26 PM IST
viral video: वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले पण... कर्मचाऱ्यांनी मांडला कॅरमचा डाव!   title=

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर: सध्या आपल्या समाजात अनेक निंदनीय प्रकार घडत असतात. त्यामुळे समाजातले अनेक घटक हे विखुरलेलेही दिसतात. पण त्यातून सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो वृद्ध नागरिकांना. त्यांच्या शारिरीक परिस्थिती त्यांना अनेक कामं करता येत नाहीत. तेव्हा त्यांना तशी मदत करू देणं गरजेचं असतं. पंरतु आपल्याला इथे असे अन्क प्रकार असतात जे लाजिरवाणे असतात. सध्या असाच एक प्रकार नागपूर परिसरात घडला आहे. (employees get busy in playing carrom while senior citizens were standing in queue)

नागपुरात संताप जनक प्रकार एका वायरल व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आलेला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील हा व्हिडिओ आहे. सध्या हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयात वयोवृद्धांची गर्दी होत होती पण दुसरीकडे मात्र कार्यालयातील कर्मचारी हे कॅरम खेळत असतानाचा हा व्हिडिओ आहे. वयोवृद्ध पेन्शनधारक प्रमाणपत्र जमा करण्यातसाठी कसेबसे कार्यालयात पोहोचत आहे. पण त्यांना तासनतास रांगेत बसून ईपीएफओ (epfo) कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना सहकार्य करण्याऐवजी कॅरम खेळण्यात घालवतांना दिसून येत आहे. या  व्हायरल विडिओ समोर आल्यानंतर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

नेमकं घडलं काय ? 

नागपुरातील भांडे लेआऊट परिसरातील कर्मचारी भविष्य निधी संगठन(EPFO) कार्यालयात चक्क कर्मचारी कॅरम खेळतांनाचा विडिओ व्हायरल झाला आहे. एकीकडे रांगा लावून वयोवृद्ध पेन्शन धारक आपले कागदपत्र जमा करण्यासाठी तासनतास बसले असताना दुसरीकडे ह्या व्हिडिओमुळे संताप व्यक्त केला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात जिवंत (हयात) असल्याचे प्रमाणात जमा करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणत वयोवृद्ध पेन्शनधारक ईपीएफओ कार्यालयात येत आहे. या व्हिडिओमध्ये कार्यालयीन कर्मचारी वयोवृद्ध पेन्शनधारक मोठया संख्येने बसलेले दिसून येत असताना ईपीएफओचे कर्मचारी कॅरेम खेळूच कसे शकतात असा संतप्त सवाल पेन्शनधारक विचारात आहेत. 

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

व्हायरल होतोय व्हिडीओ : 

या संदर्भात आज सुट्टी असल्यानं अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही, पण हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं समोर येत आहे.  यात हा व्हिडिओ वरिष्ठांना मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या असे प्रकार घडण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालणंही महत्त्वाचं ठरतं. परंतु समाजात असे प्रकारही वारंवार घडताना दिसत आहेत. वयोवृद्ध मंडळींच्या (Senior citizens) गरजेचा आणि त्यांच्या अडचणींचा कोणाही विचार करताना दिसत नाहीये. त्यामुळे वयोवृद्ध लोकांना मदतीपेक्षा अडचणींना वारंवार सामोरे जावे लागते आहे.