फेसबूक मैत्री चांगलीच महागात, ४८.५१ लाखांचा घातला गंडा

'सोशल मीडीया' अलिकडे समाजाचा आवाज अन् आरसा होवू पाहत आहे. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची मोठी फसवणुकही होऊ शकते. अकोल्यातील कवयित्री आणि फॅशन डिझायनर असलेल्या एका महिलेला फेसबूकवरील कथित परदेशी असलेल्या व्यक्तीशी मैत्री चांगलीच महागात पडली आहे.

Surendra Gangan Updated: Mar 13, 2018, 07:43 PM IST
फेसबूक मैत्री चांगलीच महागात,  ४८.५१ लाखांचा घातला गंडा

अकोला : 'सोशल मीडीया' अलिकडे समाजाचा आवाज अन् आरसा होवू पाहत आहे. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची मोठी फसवणुकही होऊ शकते. अकोल्यातील कवयित्री आणि फॅशन डिझायनर असलेल्या एका महिलेला फेसबूकवरील कथित परदेशी असलेल्या व्यक्तीशी मैत्री चांगलीच महागात पडली आहे.

अशी केली फसवणूक

सोशल मीडिया. फेसबूक, वाट्सअॅप, ट्विटर, मेसेंजर आणखी बरंच काही. ही माध्यमं जणू समाजाचा आरसाच.  मात्र, याच 'सोशल मीडिया'च्या गैरवापराच्या अनेक घटनांनी या आरशालाच तडे जावू लागले आहेत. घटना आहे अकोल्यातील. शहरातील एका ५४ वर्षीय महिलेची लंडन येथील व्हिक्टर सॅम्यूअल नामक व्यक्तीशी फेसबुकवरून ओळख झाली. उत्तम कवयित्री असलेल्या या महिलेसोबत व्हिक्टरची लवकरच मैत्रीही झालीय. फेसबुक मेसेंजर आणि वाट्सअपच्या माध्यमातून संवादही सुरू झालाय. नंतर व्हिक्टरनं या महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितले. अन् फसवणुकीचा प्रवास सुरू झाला.

असे सांगूण पैसे उकळेत

भेटवस्तूचं कुरिअर दिल्लीला कस्टममध्ये अडकल्याचं सांगत या महिलेला प्रत्येकवेळी वेगवेगळी रक्कम भरायला सांगण्यात आलीय. या सर्व प्रकारात या महिलेकडून थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल ४८ लाख ५१ हजारांची रक्कम लुबाडण्यात आलीय.

मोठे रॅकेटच सक्रिय 

यासाठी एक मोठे रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अकोल्यातील खदान पोलीसांनी लंडनमधील व्हिक्टर सॅम्यूअल नावानं फेसबुक अकाऊंट असणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केलेत.

सोशल मीडिया ही दुधारी तलवार झालीये. तिचा उपयोग योग्यपणे केला तर ठिक नाही तर फसवणुक अन पुढे नाश अटळ आहे हे सांगणारी ही घटना. म्हणून टॅक्नोसँव्ही मंडळींनी जरा जपूनच.