फेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...

एक नव्हे, दोन नव्हे तब्बल वीसहून जास्त बनावट फेसबुक अकाऊण्टस तयार केली होती नाशिकमधल्या विश्वजित जोशी या तरुणानं....

Updated: May 23, 2018, 10:27 PM IST
फेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...  title=

योगेश खरे, झी मीडिया, योगेश : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी.... तब्बल वीस बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करुन नाशिकच्या एका तरुणानं मुलींना अश्लील संदेश पाठवले. सोनल शितोळे या मुलीच्या नावाचं एक फेसबुक अकाउंट... तर दुसरं फेसबुक अकाऊंट सोनल जमाल या नावाचं... अशी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल वीसहून जास्त बनावट फेसबुक अकाऊण्टस तयार केली होती नाशिकमधल्या विश्वजित जोशी या तरुणानं.... नाशिकच्या एका मुलीला या अकाऊंटवरुन अश्लील संदेश आणि फोटो पाठवण्यात आले़... त्या मुलीनं सोनल शितोळे नावाचा हा बनावट अकाऊण्ट ब्लॉक केला. पुन्हा या मुलीला सोनल जमाल या नावाच्या बनावट फेसबुक अकाऊण्टवरुन अश्लील मेसेजेस यायला सुरुवात झाली.... आणि व्हिडिओ कॉलही आले.... अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली.... आणि असे बनावट अकाऊण्ट तयार करुन अश्लील मेसेजेस पाठवणाऱ्या विश्वजित जोशीला अटक करण्यात आली.  

विश्वजित हा उच्चशिक्षित आणि संगणक शास्रात त्यानं पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. किमान दोन हजार महिलांना त्यानं असे विकृत मेसेजेस पाठवले असावेत, असा अंदाज आहे.  

विश्वजित जोशीला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय... पण यानिमित्तानं बनावट फेसबुक अकाऊण्ट आणि त्यानिमित्तानं होणारे गुन्हे समोर आलेत.... अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारू नका.... आणि सावध राहा....