भीषण अपघातात शरीराचे तुकडे तुकडे; बाप लेकाचा एकाच वेळी मृत्यू

बाईकला ट्रकने धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघतात बाप लेकाचा एकवेळी मृत्यू झाला आहे. 

Updated: Jun 24, 2023, 10:17 PM IST
भीषण अपघातात शरीराचे तुकडे तुकडे; बाप लेकाचा एकाच  वेळी मृत्यू  title=

Accident In Gondiya : जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मृत्यू कोणाला कधी कुठे गाठेल याचा काही नेम नाही. भीषण अपघातात बाप लेकाचा एकाच  वेळी मृत्यू झाला आहे. गोंदिया येथे हा अपघात झाला आहे. या अपघात इतका भयानक होता की मृत बाप लेकाच्या शरीराराचे तुकजे तुकडे झाले आहेत. हा अपघात पाहून घटनास्थली उपस्थित असलेल्या नागरीकांच्या अंगावर काटा आला.  

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डेपो नजीक हा अपघता झाला आहे. सेवक पोंगळे (वय 60) आणि  सुनील पोंगळे (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. बाईक अपघतात या दोघांचा मृत्यू झाला आहे. 

पोंगळे पिता पुत्र दोघेही बाईकने  स्वगावी देवरी तालुक्यातील लोहारा येत होते. यावेळी एका अनियंत्रित ट्रकने यांच्या बाईकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार धडक होती. दोघेही बापलेक बाईकसह ट्रकच्या खाली चिरडले गेले. या अपघातात दोगांच्या शरीराचा संपुर्ण चेंदामेंदा झाला आहे. याची माहिती देवरी पोलीसांना देण्यात आली आहे. 

ट्रक चालक फरार

या अपघातातनंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.  पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. फरार ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. 

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना 25 हजारांचा दंड

आरटीओ आता 18 वर्षांखालील म्हणजे अल्पवयीनांच्या वाहन चालवण्यावर करडी नजर ठेवणार आहे. आरटीओ अल्पवयीनांसाठीच्या जुन्या नियमाची नव्यानं कठोरपणे अंमलबजावणी करणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार 18 वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेल्यास तब्बल 25 हजारांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इतकच नाही तर पालकांना जेलची तरतूदही करण्यात आली आहे.  18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवल्यास 25 हजारांचा दंड आकाराल जाईल.  वाहन चालक, मालक अथवा पालक यांना 3 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षेची तरतूद. 

दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही.  1 वर्षांपर्यंत वाहन नोंदणी रद्द होऊ शकते, त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवता येणार नाही.  कमी वयाची मुलं रस्त्यावर सुसाट वाहन चालवताना दिसतात. अशा अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात घडल्याच्या दुर्घटना आहेत. त्यामुळे आरटीओच्या या जुन्या नियमाची नव्यानं अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्थात 28 ऑगस्ट 2019 पासून हा नियम लागू असला तरी अजूनपर्यंत एकही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे आता तरी आरटीओकडून या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.