भिवंडीत कापडाच्या कारखान्याला आग, जीवितहानी नाही

ठाण्यात जाणवणारी पाण्याची टंचाई हा अग्निशमन दलासमोरच मोठा प्रश्न आहे

Updated: Dec 31, 2018, 11:18 AM IST
भिवंडीत कापडाच्या कारखान्याला आग, जीवितहानी नाही title=

भिवंडी : भिवंडीतल्या एका कपड्याच्या कारखान्याला आज पुन्हा एकदा आग लागलीय. घटनास्थळी मोठ्या अग्निशमन कर्मचारी पाचारण करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात भिवंडीत कागदाच्या गोदामाला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल २० तासांहून अधिक काळ लागला होता. शिवाय पाण्याचीही मोठी कमतरता जाणावली होती. त्यातच आज आणखी एक आग लागल्यानं अग्निशमन यंत्रणेची तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

सुदैवानं या कापड कारखान्यात कुणीही अडकलं नसल्याचं समजतंय. परंतु, जागेवर मोठ्या प्रमाणात कापड आणि केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यानं थोड्याच वेळात आगीनं उग्र रूप धारण केलंय. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. 

ठाण्यात विविध ठिकाणी लागणाऱ्या आगी आणि त्याचवेळी या भागात जाणवणारी पाण्याची टंचाई हा अग्निशमन दलासमोरच मोठा प्रश्न आहे. पाण्याची टंचाई असूनही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.