तरूणीसोबत सेल्फी काढण्याच्या वादातून गोळीबार

 तरूण तरूणींचा एक गट वाढदिवस साजरा करत असताना नागपूरच्या कुख्यात...

Jaywant Patil Updated: Apr 9, 2018, 02:52 PM IST

नागपूर : तरूणीसोबत सेल्फी काढण्याच्या वादातून गुंडाने हवेत गोळीबार केला. नागपूरच्या झिरो डिग्री बारमध्ये हा प्रकार घडला. तरूण तरूणींचा एक गट वाढदिवस साजरा करत असताना नागपूरच्या कुख्यात माया गँगचा गुंड मिहीर मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी त्या गटातल्या मुलीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकारात गुंड मिहीर मिश्राने हवेत गोळीबार केला. एमआयडीसी पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मिहीर मिश्रा फरार आहे.