काकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार भावांना वाटेतच मृत्यूने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. छत्रपती संभाजीनरमध्ये वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील 4 भावंडाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 24, 2023, 07:02 PM IST
काकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार भावांना वाटेतच मृत्यूने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात title=

Accident On Samruddhi Highway :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर  (Samruddhi ExpressWay) संभाजी नगर येथे  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे चौघे भाऊ काकांच्या अंत्यविधीच्यासाठी गेले होते. परत  येताना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. एकाच वेळी चौघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

श्रीनिवास गौड (वय 38 वर्षे), कृष्णा गौड ( वय 39 वर्षे),  संजीव गौड ( वय 46 वर्षे) आणि सुरेश गौड ( वय 39 वर्षे) अशी या चार मृत भावंडांची नावे आहेत. भार्गव गौड ( वय 18 वर्षे) हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व जण सुरत गुजरात राज्यातील रहिवाशी आहे. 

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात बुधवारी त्यांच्या ईरटीगा (GJ 05 RN 8450)  कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळेस वाहन भरधाव वेगात कार चालवत असताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना विजय जारवल, सुभाष भाकरे हे पुढील तपास करीत आहे. 

काकांच्या अंत्यविधीसाठी तेलंगणा येथे गेले होते

हे सर्वजण दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथील काकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम आटोपून सुरतकडे परतत होते. मात्र, वाहन चालकाला डुलकी लागल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकच उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये अपघात 12 जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गा वरील अपघातांची मालिका सुरुच आहे. कारंजा ते दोनद दरम्यान समृद्धी महामार्गावर बुधवारी रात्री 1 च्या सुमारास शिर्डीकडून नागपूरच्या कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा चा अपघात झाला.  या अपघातात 12 जण गंभीर तर 18 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालकाने अचानक लेन कटिंग केल्यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी ट्रकवर धडकल्याने हा अपघात घडला माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील जखमींना कारंजा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून गंभीर जखमीना पुढील उपचारासासाठी नागपूर ला पाठविण्यात आले.