शिर्डीमध्ये मिळणार मोफत वाय-फाय

शिर्डीत येणार-या साईभक्तांसाठी आता मोफत वाय-फाय सुविधा दिली जाणर आहे.

Updated: Jul 17, 2017, 08:30 PM IST
शिर्डीमध्ये मिळणार मोफत वाय-फाय

शिर्डी : शिर्डीत येणार-या साईभक्तांसाठी आता मोफत वाय-फाय सुविधा दिली जाणर आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने साई मंदीर परीसर, प्रसादालय आणि भक्त निवासात ही सुविधा भक्तांना दिली जाणार आहे.

एका नंबरवर दिवसातून फक्त 250 एमबी वाय-फाय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिर्डीतील 15 ठिकाणी ही वाय-फाय सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे मात्र साईबाबा मंदीर परिसरात सुरक्षेच्या कारणाने मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाय-फाय सुविधेमुळे साईमंदीराच्या सुरक्षेला धोका होवु शकतो का तसेच मंदीर परीसरात अनावश्यक गर्दी होईल अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त करत वाय-फाय सेवेतून साई मंदीर परीसर वगळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.