बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड - सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना

Ganeshotsav 2023 : मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यामुळे आता दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 19, 2023, 11:50 AM IST
बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड - सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : राज्यात गणरायाचे (Ganeshotsav 2023) उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये (manmad chhatrapati shivaji maharaj special express) गेल्या 27 वर्षांपासून प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याहस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.

मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसच्या पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी पासधारक बोगीमध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे. तसेच रेल्वे सुरक्षेबाबत यावेळी संदेशही देणारे पोस्टरही या बोगीमध्ये चिटकवण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे. यावेळी चाकरमान्यांसह आमदार सुहास कांदे यांनीही बँडच्या तालावर ठेका धरला. राज्यावरील दुष्काळ दूर व्हावा असे साकडे आमदार कांदे यांनी गणरायांना घातले आहे.

दुष्काळ दूर होऊ दे अशी गणपती चरणी प्रार्थना - आमदार सुहास कांदे

"भारतात एकमेक ठिकाणी रेल्वेमध्ये गणपती बसवण्यात आला आहे. मी गणपती बाप्पाजवळ एकच प्रार्थना करतो की रेल्वेप्रवाशांसमोर जे विघ्न असेल ते दूर करावे आणि त्यांच्या घरी सुख शांती लाभू दे. माझ्या नांदगाव मतदार संघामध्ये सुखशांती लाभू दे. पाऊस पडू दे. दुष्काळ दूर होऊ दे अशी गणपती चरणी प्रार्थना केली. भारतात रेल्वेत कधीच कुठे गणपती बसवला जात नाही. पण इथे बसवला जातो," असे आमदार सुहास कांदे म्हणाले. 

नाशकात गणरायाचं उत्साहात स्वागत 

आज गणरायचं सकाळपासूनच आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायला नाचत गाजत भाविक हे आपल्या लाडक्या गणरायला घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देऊन गणाऱ्याच आगमन केल जातं आहे. या वेळी मोठा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळतो आहे.

नागपुरात संती गणपतीची स्थापना

नागपुरातील मानाचे आणि सर्वात मोठे गणेश मंडळ म्हणून ओळख असलेल्या संती गणपतीची आज सकाळी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली आहे यंदा मंडळाने हुबेहूब मीनाक्षी मंदिर देखावा साकारला आहे. 66 वर्षांपासून संती गणेश मंडळ देशातील विविध मंदिरांची प्रतिकृती साकारत आहे. यंदा गणरायाच्या मूर्तीवर आणि मीनाक्षी देवीला भक्तांनी सुमारे 15 लाखांचे दागिने चढविले आहेत. पुढील 10 दिवस आता नागपूरच नव्हे विदर्भातील गणेशभक्त संतीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पोहचतील.