रत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत

 गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.

Updated: Aug 27, 2020, 09:21 PM IST
रत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत  title=
संग्रहित छाया - Image courtesy: IANS

रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. बोऱ्या जेटीवर गणपती विसर्जन करत असताना दोघे बुडाल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जना वेळी जेटीवर सातजण गणपती विसर्जन करत असताना, मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.

गौरी - गणपती विसर्जन करताना बोऱ्या जेटीवर विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडालेत. वैभव देवळे आणि अनिकेत हळये यांना पोहोता येत नसल्याने ते बुडाले. संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजता दरम्यान ही घटना घडली. बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. 

बाप्पाला निरोप

गणपती बाप्पा मोरला पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज कोकणात गणपतीला निरोप देण्यात आला. गौरी विसर्जनासोबत गणपती विसर्जनाची कोकणात मोठी परंपरा आहे. त्यांमुळे गौरीचं विसर्जन झाल्यानंतर कोकणातल्या घरगुती गणपतींच विसर्जन होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील आज १ लाख  १५ हजार ७३७ घरगुती गणपतीचं तर १६ सार्वजनिक गणपतीचं विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने होत आहे. कोरोनाचं संकट आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव गणेशविसर्जनासाठी उभारण्यात आलेत. ढोल ताशांच्या गजरा शिवाय अत्यंत साध्या पद्धतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात विसर्जन करण्यात आलं. गणेश भक्तांनी गणरायाला साश्रुनयनानी निरोप दिला.