बिबट्याला पकडण्यासाठी गिरीश महाजन यांचा स्टंट

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्यानं धुमाकूळ घातलाय.

Updated: Nov 27, 2017, 07:47 PM IST
बिबट्याला पकडण्यासाठी गिरीश महाजन यांचा स्टंट title=

जळगाव :  गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. या बिबट्यानं गेल्या महिनाभरात पाच जणांची शिकार केल्यानं बिबट्याला दिसताक्षणीच ठार मारण्याचे आदेश सरकारनं दिलेत.

सरकारचे हे आदेश शिरसावंद्य मानत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे स्वतः हातात बंदूक घेऊन मोहीमेवर निघाले. वन विभाग, पोलीस तसंच प्रशासनानं बिबट्याच्या शोधासाठी जंगलात खास मोहीम सुरू केलीय.

गिरीश महाजन हातात बंदूक घेऊन, स्वतः त्यात सहभागी झाले. या भागात जवळपास ११ नरभक्षक बिबट्यांचा संचार असल्यानं मंत्र्यांना स्वतःच बंदूक हातात घ्यावी लागलीय.

दरम्यान, हे मंत्र्यांचं काम आहे का, असा सवालही केला जातोय... एकीकडं वन विभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत असताना, हा गिरीश महाजनांचा प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे का, अशी विचारणा केली जात आहे.