Gold - Silver Price : सोने - चांदीच्या दरात तिसऱ्या दिवशी घसरण, पाहा आजचा दर

Gold price : सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे.  

Updated: Jun 18, 2021, 05:40 PM IST
Gold - Silver Price : सोने - चांदीच्या दरात तिसऱ्या दिवशी घसरण, पाहा आजचा दर title=

जळगाव : Gold price : सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. गुरुवारी 1 हजार 200 रुपयांची घसरण झाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी सराफ बाजाराला सुरुवात होताच सोन्याचे दर (Gold price) पुन्हा दीडशे रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी सोने दहा ग्रॅम म्हणजेच प्रति तोळ्याचे दर 47 हजार 800 इतके नोंदवले गेले. तर चांदीच्या दरात (Silver Price) देखील तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 70 हजार प्रति किलो होता.

याआधी सोन्याने गाठला होता 58 हजारांचा टप्पा

कोरोना काळात सहा महिन्यांपूर्वी सोने दराने 58 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यावेळी सर्वच तज्ज्ञांचे अंदाज चुकले होते. आता त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी 58 हजारांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीचा थेट परिणाम होत असल्याने सोन्याचे दर खाली येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डॉलरची किंमत घसरल्याने सोने दरावर परिणाम

डॉलरची किंमत घसरल्याने सोने दरावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. अशी माहिती सुवर्ण व्यापाऱ्यांनी दिली आहे. भंगाळे गोल्ड संचालक आकाश भंगाळे यांनी सांगितले की, जागतिक घडामोडीचा हा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. डॉलरचे मूल्य घसल्याचा हा परिणाम दिसून येत आहे.

सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात चैत्यन्य निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने बंद होती. सोने खरेदी ही थांबली होती. परंतु, आता भाव कमी झाले असून आम्हाला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया गहकांनी दिली आहे.