आता गुगल देणार मराठी भाषेतून ही सेवा

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून मराठी माणसांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मराठी जनांना यापुढे गुगलसोबत मराठीत बोलता येणार आहे. तुम्ही मराठीत विचारलेल्या प्रश्नांची गुगल उत्तर देऊ शकणार आहे. आतापर्यंत आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा उपलब्ध होत होती. 

Updated: Aug 14, 2017, 08:59 PM IST
आता गुगल देणार मराठी भाषेतून ही सेवा title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून मराठी माणसांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मराठी जनांना यापुढे गुगलसोबत मराठीत बोलता येणार आहे. तुम्ही मराठीत विचारलेल्या प्रश्नांची गुगल उत्तर देऊ शकणार आहे. आतापर्यंत आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा उपलब्ध होत होती. 
  दिवसेंदिवस गुगल सर्च इंजिनमध्ये मराठी वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. तरीही गुगलकडून मिळणारी व्हॉईस सर्चची सुविधा मराठीत उपलब्ध नव्हती. पण गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मराठी भाषेचा समावेश असणार आहे. 
  
 २०२१ पर्यंत गुगलवर भारतीय भाषांचा वापर करणा-यांची संख्या जवळपास ५३.६ कोटी  होणार असल्याचे एका अहवाला म्हटले आहे. भारतातील वेगवेगळे भाषिक गुगलचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे इथल्या विविध भाषिकांची संख्या जास्त आहे. आवाजाचे वेगवेगळे नमुने मिळवण्यासाठी भारतीय भाषा बोलणा-यांसोबत गुगल काम करत आहे. सध्या जगभरात गुगल व्हॉइस सर्च ११९ भाषांना सपोर्ट करत आहे. '' गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंबंधी माहिती दिली.  

असा करा वापर

व्हॉइस सर्चचा वापर करण्यासाठी तुम्हाला याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पहिले गुगल प्ले स्टोअरवरून जीबोर्ड अॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे. त्यानंतर  व्हॉइस सेटिंगमधून तुमच्या आवडीच्या भाषेचा पर्याय निवडता येणार आहे. यामध्ये तुम्ही मराठी भाषेचा पर्याय निवडू शकता.  तुम्हाला हवी असलेली माहिती गुगलच्या या अॅपवर बोलून सर्च करता येणार आहे.